प्राधिकरण : तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी व भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी प्राधिकरण येथून रुग्णवाहिकेसोबत डॉक्टरांचे पथक रवाना झाले.
उद्योजक प्रदीप तासगांवकर यांच्या हस्ते नारळ वाढवून हे पथक पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. यावेळी विश्वस्त श्रीराम नलावडे, डॉ. प्रकाश सातव, डॉ. प्रमोद इंगळे, डॉ. नीलिमा बांगी, डॉ. वसंतराव गोरडे, ज्ञानेश्वर कदम, अरुण महाजन, प्रवीण मोळावडे, सुरेश कदम, सीताराम आहेर, भाऊसाहेब ठोंबरे, संतोष नलवडे उपस्थित होते.
हे वैद्यकीय पथक सलग ०५ दिवस विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शन बारीमधील वारकरी, भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा व औषधी पुरविणार आहे. वैष्णव ट्रस्ट आषाढी वारी व कार्तिक एकादशीला येणाऱ्या भाविकांना गेली २९ वर्षांपासून निरंतर वैद्यकीय सेवा पुरवित आहे.