कासेगांव : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील सर्व ज्येष्ठ रहिवासी भैरवनाथ कृष्णात वाडकर यांचे वृद्धापकाळात अल्प आजारात मंगळवारी, सकाळी निधन झाले. त्यांच्याकडं गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ तथा ४ पिढ्यांचे साक्षीदार म्हणून ते गणले जात होते. मृत्यूसमयी त्यांनी शंभरी ओलांडली होती.
त्यांच्या पश्चात २ विवाहित मुले, १ विवाहित मुलगी, सुना-नातवंडे आणि परतुंडे आहेत. ते कासेगांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकर मच्छिंद्र वाडकर यांचे आजोबा होत.