Type Here to Get Search Results !

मुळेगांव येथे संविधान दिन साजरा

 


सोलापूर : दक्षिण सोलापूर मुळेगांव येथे पंचशील मागासवर्गीय बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती नळपती बनसोडे हे उपस्थित होते. 

प्रारंभी प्रमुख पाहुणे माजी सभापती नळपती बनसोडे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रेयस सावंत यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन करून सर्व एकत्रित बांधव यांनी बुध्दवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष नागनाथ खरात, उपाध्यक्ष काशिनाथ बनसोडे, सचिव राजू बनसोडे, सहसचिव सिध्देश्वर दुपारगुडे, खजिनदार मिथुन सावंत, सदस्य विनोद दुपारगुडे, जेष्ठ नागरीक ऋषिकेश बनसोडे, सतिश गायकवाड, विशाल सावंत, नारायण जेटीथोर, नागेश साखरे, ग्रामपंचायत सदस्य अजमेर शेख, अमोल बनसोडे, दशरथ सितासावंत, नवनाथ बनसोडे, शशी बनसोडे, सागर साखरे, यशवंत मस्के, खंडू बडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.