Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सचिवपदी सोलापूरचे दत्ता भोसले


सोलापूर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ सचिवपदी येथील छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे दत्ता भोसले,संगमेश्वरचे राहुल कराडे सहसचिव आणि उपाध्यक्षपदी मोडनिंबच्या महाडिक महाविद्यालयाच्या राजेंद्र गिड्डे यांची निवड झाली. 

के.एम.अग्रवाल कॉलेज, कल्याण येथे सोमवारी महासंघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यात महासंघाचे सरचिटणीस डॉ.आर. बी. सिंह (मुंबई), अध्यक्ष रा. जा. बडे (अमरावती), कार्याध्यक्ष शशिकांत कामठे (पुणे) व गोविंद जोशी (नांदेड) तर कोषाध्यक्षपदी अनिल लबरे ( मुंबई) यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

-------

महासंघावर निवडलेले सोलापूरचे अन्य सदस्य 

सल्लागार : राजेंद्र गोटे, प्रसिद्धी समिती सचिव : अजितकुमार संगवे, प्रसिद्धी समिती सदस्य : आनंद व्हटकर, सहसचिव : राहुल कराडे (संगमेश्वर कॉलेज), विभागीय सचिव : सूर्यकांत पारखे (उमा महाविद्यालय, पंढरपूर), महिला संघटक : आरती देशक (वसुंधरा महाविद्यालय) व प्रज्ञा हेंद्रे (दयानंद महाविद्यालय),  सदस्य : विजय कोळी (रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहनिर्माण, अकलूज), हनुमंत खपाले (कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा).