सोलापूर : पत्रकार सुरक्षा समिती मोहोळ तालुकाची बैठक बेगमपूर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष अमर पवार होते. या बैठकीत राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती या सर्व विषयांचा शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे एकमताने निश्चित करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती, राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना, अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे,
पत्रकारांच्या वाहनांना टोलमधून सूट देणे, पत्रकारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती देणे, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी आणि पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण
यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्र आणून प्रश्न सोडवणार
ग्रामीण भागातील पत्रकारांची अवस्था खूपच वाईट असून समस्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्र घेऊन प्रश्न सोडवणार असल्याचे तालुका अध्यक्ष अमर पवार यांनी यावेळी सांगितले.
प्रश्न सोडण्यासाठी पत्रकारांची एकजूट
ही काळाची गरज : यशवंत पवार
राज्यातील पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहेत. शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांचे अनेक प्रश्न शासन दरबारात धूळ खात पडले आहेत. राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर पत्रकारांची एकजूट असणे आवश्यक असल्याचे मत पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
या बैठकीला दैनिक 'लोकशाही मतदार ' चे संपादक अक्षय बबलाद, तालुका उपाध्यक्ष बंडू तोडकर, तालुका कार्याध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर, महादेव शेवाळे, अजय तोडकर, भोई इत्यादी उपस्थित होते.