सोलापूर/२९ नोव्हेंबर : संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असून उप मुख्यमंत्री व तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये “महाराष्ट्र श्री अन्न अभियाना”ची घोषणा केली. या अभियानासाठी तब्बल २०० कोटी रुपयांची तरतूद करून सोलापूर येथे “श्री अन्न उत्कृष्टता केंद्र" स्थापन करण्याची तरतूद शासनाने केली होती. मात्र सत्तेत अजित पवार गट सामील झाला. आता या उत्कृष्टता केंद्राचे प्रशिक्षण केंद्रचे ठिकाण सोलापूरमधून थेट बारामतीला हलवण्याचा निर्णय झाला आहे. याला सर्वस्वी भारतीय जनता पार्टी व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार असल्याचा आरोप सोलापूर जिल्ह्य काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केला आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सदर केंद्र सोलापूरसाठी जाहीर केले होते, परंतु भाजपाच्या सोलापूर पालकमंत्रीसह इतर नेत्यांना हे केंद्र इथे टिकवण्यात सपशेल अपयश आले आहे. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व व रोजगाराची निर्माण होणार होती. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भाजपा १० आमदार व ०२ खासदारांविषयी प्रचंड रोष पसरला आहे. त्यामुळे ते केंद्र इथून जाण्यास सर्वस्वी भाजप व पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप देखील विजयकुमार हत्तुरे यांनी केला.
' एक जिल्हा, एक उत्पादन ' या आधारावर सोलापूर, ठाणे व नंदूरबार या जिल्ह्याकरीता हे केंद्र होते. १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या प्रकल्पासाठी शासन खर्च करणार होता, परंतु सदर केंद्र हलवल्यामुळे सोलापूर जिल्हा हा विकासापासून वंचित राहणार आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. याची सर्वस्वी जबाबदार जनता पार्टीची आहे. कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी काल सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे खुलासा करण्याबाबत मागणी केली होती.
त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा प्रशासनाने खुलासा केला की, प्रशिक्षण केंद्र हे बारामतीला जाणार असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी तात्काळ राजीनामे देऊन घरी बसावे. दक्षिण सोलापूर होटगी या ठिकाणीच केंद्र राहावे, अन्यथा स्थलांतर झाल्यास सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तालुका-तालुक्यात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभा करण्यात येईल. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घेराव घालून जाब विचारण्यात येईल, असा इशारा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिला आहे.