Type Here to Get Search Results !

बेवारस बालकांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

सोलापूर /२९ : साई व अर्जुन ही  बालके जि. वारंगल, राज्य तेलंगणा येथे बेवारस सापडले आहे.  बाल कल्याण समिती सोलापूर यांचे आदेशाने दि. 22 एप्रिल 2019  रोजी,  मंगेश हे बालक लोहमार्ग पोलीस स्टेशन, सोलापूर मार्फत बाल कल्याण समितीच्या आदेशाने 04 मार्च 2020 रोजी,  शांतम्मा व विठ्ठलगौडा ही बालके जोडभावी पोलीस स्टेशन,सोलापूर मार्फत बाल कल्याण समितीच्या आदेशाने 23 जून 2019 रोजी मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह सोलापूर या संस्थेत दाखल करण्यात आली आहेत.   तसेच नरेंद्र परमेश्वर मोची हे बालक बाल कल्याण समितीच्या आदेशाने 13 जून 2022 रोजी आई बहुउद्देशीय बालगृह, सोलापूर या संस्थेत दाखल करण्यात आले असल्याचे  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

तरी बाळाच्या पालकांना व नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की, ही माहिती प्रसिद्ध झालेपासुन 30 दिवसाच्या आत  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे संपर्क क्र. - 7219104503 किंवा बाल कल्याण समिती, जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृह/बालगृह, 937/9,नार्थ सदर बझार,सोलापूर व आई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, वसंत विहार, सोलापूर यांचेशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.