... राजे जाधव वंशजांची होतेय नाहक बदनामी
बुलढाणा : 'शौर्यवंत' आडनावाच्या परीस स्पर्शासाठी 'नामदेवा'ची तोतयागिरी होत असल्याची खंत राष्ट्रमाता जिजाऊ नानी लखोजी राजे जाधव यांच्या वंशजांनी व्यक्त केली आहे. केवळ आडनावाच्या लाभावरून नामदेवराव त्याचा वंश वारसा सिंदखेडराजा च्या राजे जाधव घराण्याची करीत आहे. त्याचा राजे जाधव घराण्याच्या वंशावळीत त्याचं नाव नाही. त्याच्या तोतयागिरीने... राजे जाधव वंशजांची होतेय नाहक बदनामी होत असल्याची तक्रार राजे जाधव घराण्याचे वंशज प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली असून सत्याची पडताळणी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली-सराटी येथील क्रांती योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रमुख मुद्द्यावर सुरू केलेले आमरण उपोषणाने संपूर्ण राज्यातील सकल समाजाचं समाजमन ढवळून निघाले आहे. क्रांती योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी, राज्य शासनाकडे ५० टक्के च्या आत टिकणारं आरक्षण सुरू केलेल्या आमरण उपोषणामुळे राज्य सरकारलाही हादरवून सोडले.
त्याच दरम्यान इतर मागास प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागणार, अशी पेरणी स्वतःला ओबीसींचे तारणहार मानणारे नेते करीत होते. त्याच दरम्यान प्रा. 'नामदेव' रावांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासंबंधी केलेले वक्तव्य सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांवर झळकले होते. त्यामुळे प्राध्यापक 'नामदेव' राव प्रचंड चर्चेत आले होते. त्यांनी स्वतःला जिजाऊंचे 'कुळ' वारस असल्याचा दावा केला होता. त्यामुळे समाजातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
अशातच, १२ नोव्हेंबर रोजी लखोजी राजे जाधव यांचे वंश वारस प्रा. गोपाल राजे भगवानराव जाधव यांनी, आमदार रोहित पवार यांना लिहिलेल्या निवेदनात, 'नामदेव' राव यांचा राजे जाधव यांच्या वंश वर्षाची कोणताही संबंध नसल्याचे म्हटले असून त्यांनी पवार साहेबांची केलेली बदनामी आणि राजे जाधव यांचा वंश वारसा सांगून केलेल्या तोतयागिरीची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि बदनामीचा मागणी केली आहे.
स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव
सिंदखेडराजा यांचे वंशज प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव
किनगाव राजा, तालुका सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा यांनी दिलेल्या निवेदनात पुढीलप्रमाणे मजकूर आहे.
प्रति,
मा. रोहितदादा पवार,
मा. आमदार,
विषय : जिजाऊंचे तोतया वंशज नामदेव जाधव याचेबाबत,
महोदय,
उपरोक्त विषयी सदर निवेदन आपणास सादर करतो की, सध्या सोशल मीडिया व इतर प्रसार माध्यमावर नामदेव जाधव नामक व्यक्ती मी जिजाऊंचा वंशज म्हणून फिरत असून तो स्वतःचा उल्लेख जिजाऊंचा वंशज लखोजीराजे जाधव यांचा वंशज म्हणून फिरत असून तो लखोजी राजे यांचा वंशज नसून तू एक जाधव आडनावाचा व्यक्ती आहे. त्याचा आणि लखोजीराजे जाधव घराण्याचा कुठलाही नातेसंबंध, सोयरसंबंध वंशावळ अस्सल यामध्ये कुठेही नसून तो फक्त प्रसिद्धीसाठी वंशज म्हणून पवार साहेब यांच्यावर टीका करतोय.
आम्ही सर्व लखोजीराजे यांचे वंशज सिंदखेडराजा परिसर
आपणास निवेदनाद्वारे विनंती करतो की, त्याची कायदेशीर चौकशी करून त्याने केलेली फसवेगिरी उजेडात आणावी व त्याच्यावर फसवणूक आणि अपप्रचाराचा गुन्हा दाखल करावा. त्यामुळे मूळ राजे जाधव वंशज यांची नाहक बदनामी होत आहे.
करिता माहितीस्तव सादर
आपला विश्वासू
प्रा.राजे गोपाल जाधव
आनंद को. राजे जाधव
सुभाष वि. राजे जाधव
मार्तंडराव वि. राजे जाधव
या उपरोक्त निवेदनातील मजकूर लक्षात घेता, शौर्यवंत आडनावाच्या परीस स्पर्शासाठी 'नामदेवा'ची तोतयागिरी ! ... राजे जाधव वंशजांची होतेय नाहक बदनामी होत असल्याचे दिसून येत आहे.