संचालकपदी माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांची अविरोध निवड

shivrajya patra
महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेच्या वतीने सत्कार

जालना : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांची अविरोध निवड झाल्याप्रित्यर्थ महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष ॲड. अकरमखान पठाण व महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदचे सदस्य सय्यद रफीक अली यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांनी बदनापूर शहरातील महाराष्ट्र मल्टी सर्व्हिसेस या दुकानाला सदिच्छा भेट दिली. यावेळी पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र शिंदे बाबा, नगरसेवक शेख इकबाल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्रीमंत जऱ्हाड, हाजी परवेज कुरेशीसह आदी उपस्थित होते.
To Top