Type Here to Get Search Results !

... आम्ही पाठपुरावा करून त्या नागरी समस्येचे करू निरसन : युवा जिल्हाध्यक्ष अॅड. योगेश शिदगणे

सोलापूर : शहरातील नागरिकांनी आपल्या कोणत्याही समस्या आम्हाला कळवा, त्याचा आम्ही पाठपुरावा करून त्या नागरी समस्येचे निरसन करून आपले समाधान करू, असं बहुजन मुक्ती पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष अॅडवोकेट योगेश शिदगणे यांनी म्हटले आहे. 
सोलापूर शहरातील नई जिंदगी जवळील रस्त्यावरील सितारा चौक ते शांती नगर (मरकज मेडिकल) मार्गावरील स्ट्रीट लाईटच्या १५ खांबावरील पथदिवे गेल्या तीन महिन्यापासून महिन्यापासून बंद होते. काही नागरिकांनी ही समस्या बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना कळविली. तीन महिन्यात सलग पाठपुरावा करून ही या समस्येकडे सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिले नव्हते.
बहुजन मुक्ती पार्टीच्या युवा कार्यकारिणीने या प्रश्नी, लक्ष केंद्रित केलं. गेल्या तीन महिन्यापासून महीण्यापासून वारंवार प्रयत्न करूनही समस्येचे समाधान होत नसल्याची माहिती बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. ही माहिती मिळताच, बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रयत्नाने ३ दिवसात नवीन लाईट व नवीन वायरिंग जोडून लाईट सुरू करण्यात आली. यावर या परिसरातील नागरिकांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त केले.