माळशिरस : तालुक्यातील अकलूज येथील मोहनराव देशमुख यांच्या घरासमोर दिवाळीनिमित्त साकारण्यात आलेला किल्ला अकलूजकरांचा अन् बहुजनांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून चर्चेत आहे. स्वराज्यातला किल्ला म्हणालं तर राजे छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्याच्या शिरोभागी असून मराठा समाजाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून पाहिले जात असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या संघर्ष लढ्याला उजाळा देणारा
"मराठा आरक्षणाचा किल्ला" म्हणून सामान्य जनता त्याकडे मोठ्या कुतूहलाने त्याकडं पाहत आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली-सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याने संपूर्ण महाराष्ट्राचे समाजमन ढवळून काढत जागे केले आहे. त्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी अकलूजमध्ये मोहनराव देशमुख यांच्या निवासस्थानासमोर दिवाळीनिमित्त साकारण्यात आलेला किल्ला "मराठा आरक्षणाचा किल्ला" म्हणून सामान्य जनतेच्या चर्चेत आहे..
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रत्येक टप्पा किल्याच्या एका एका पायरीवर दर्शिवला आहे,जसा किल्ला सर कराल तसा आंदोलनाचा प्रत्येक टप्पा मराठा आरक्षणाच्या जवळ घेऊन जात आहे, अशी किल्ल्याची कल्पकतेने बांधणी केली आहे. माथ्यावर सरसकट मराठा आरक्षणाचे साकडे शिवरायांच्या चरणी घातले आहे.
- मोहनराव देशमुख,
अकलूज जि. सोलापूर .
9765961212