समाजात-समाजात तेढ निर्माण करु पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई : पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद

shivrajya patra
सोलापूर : सोशल मिडीयावर संत,महापुरुषांबद्दल अवमानकारक पोस्ट प्रसारीत करुन समाजात तेढ निर्माण करु पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.

सोमवारी टिपू सुलतान जयंतीदिनी एका युवकानं, सोशल मिडीयावर राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर बसलेल्या छायाचित्रामध्ये फेरबदल करून, छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा बदलून टिपू सुलतान यांचा फोटो लावून तो फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत केला. त्याचा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. 

त्यामुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याची तक्रार शिवानंद सिद्धारेड्डी कावडे (रा.एन.जी. मिल चाळ, मुरारजी पेठ, नागोबा मंदीरजवळ, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार साहील शेख नावाच्या युवकाविरुद्ध भा. दं. वि. सं. १८६० नुसार १५३ अ व २९५ अ कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यावर बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
To Top