Type Here to Get Search Results !

धक्कादायक .......... ........ ३ अपत्यासह विवाहिता बेपत्ता

 

                                               (प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर : सोलापुरात मानवी मनाला धक्का देणारी घटना घडलीय. वसंत विहार नजिकच्या बनशेट्टी नगरातील एक २८ वर्षीय विवाहिता सोमवारी, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरात कोणास नाही न सांगता तिच्या ३ लहान मुलांसह निघून गेली आहे. तिच्या कुटुंबियांनी शोध घेतला, ते सर्व जण मिळून न आल्याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ' मिसींग ' दाखल केलंय.

बनशेट्टी नगरातील ती विवाहिता ३ अपत्यासह निघून गेल्यावर तिच्या पतीनं पोलिसांना कळविलं आहे. तिच्या अंगावर नेसणेस हिरव्या रंगाची साडी तर लहान मुलांनी टी-शर्ट आणि हाफ चड्डी परिधान केलेली आहे.

तिचा वर्ण - गोरा, उंची : अंदाजे १६५ से.मी बांधा : मध्यम, शिक्षण : १० वी तर बोली भाषा: मराठी आहे. यासंबंधी फौजदार चावडी पोलिस स्टेशनकडील बेपत्ता रजि. नंबर ११५/२०२३ अन्वये त्याची बेपत्ता नोंद झालीय.

वरील वर्णनाचे बेपत्ता व्यक्ती व ३ लहान मुले आपणास आढळल्यास अथवा त्या संदर्भात काही उपयुक्त माहिती मिळून आल्यास फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर दूरध्वनी क्र. ०२१७/२७४४६२१ अथवा ७५०७४४४२२२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शहर पोलिसांनी केलं आहे.