Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र किशोर खो खो संघाचे सहाय्यक प्रशिक्षकपदी उमाकांत गायकवाड

 

सोलापूर : सोलापूर ॲम्युचर असोसिएशनचे व उत्कर्ष क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक  उमाकांत गायकवाड यांची महाराष्ट्र किशोर खो खो संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी कळविले. या निवडीबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, सरचिटणीस ए. बी. संगवे आणि सर्व पदाधिकारी-सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केले. 

उमाकांत गायकवाड हे सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे तांत्रिक समिती सचिव आहेत. त्यांनी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला होता. 

१३ ते १७ डिसेंबर या कालावधीत ३३ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा कर्नाटकात होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे किशोर व किशोरी संघ भाग घेणार आहेत. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचे  स्पर्धा-पूर्व प्रशिक्षण शिबिर ०४ डिसेंबरपासून चिंचणी, पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे. तेथे व स्पर्धेत ते  महाराष्ट्राच्या किशोर संघास मार्गदर्शन करतील.