मुंबई : राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या आजारपणावर शंका उपस्थित केली होती. त्यावर, माझे आजारपण खोटे असेल तर मला भर चौकात जोड्याने मारा आणि खरे असेल तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो, असं खुलं आव्हान दिलंय.
एकनाथ खडसे यांच्या प्रकृती अस्वास्थानंतर त्यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईला नेण्यात आलं होतं. त्यांनी केवळ सहानुभूती मिळविण्यासाठीचा केलेला खटाटोप असे मंत्री महाजन यांनी म्हटले होते.
त्यांनी खडसे यांच्या आजारपणासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर खडसे यांनी, श्रीमान गिरीश महाजन, नाटक करण्याची मला कधी गरज पडत नाही व तो माझा धंदाही नाही. त्यासंदर्भात आज मी तुम्हाला आवाहन करतो, माझ्या आजारपणाचे सगळे कागदपत्रे तपासा, माझे आजारपण खोटे असेल तर मला भर चौकात जोड्याने मारा आणि खरे असेल तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो, असं आव्हान त्यांनी ट्विटर हँडलवर
https://twitter.com/EknathGKhadse/status/1727662915031826523?t=sPZ7vq0g29WqyH0g8l-iVg&s=08
गिरीश महाजनांना दिलं आहे.