सोलापूर : येथील होटगी रोड गुरू छाया अपार्टमेंट येथील रहिवासी श्रीमती कल्पना केशव कोल्हटकर यांचे अल्पशः आजाराने गुरूवारी, २३ नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. कल्पना कोल्हटकर या पाटबंधारे विभागात ३५ वर्ष कार्यरत होत्या. सर्वांना सर्वतोपरी मदत करणे आणि सतत हसतं मुखी अशी त्यांची जनमानसांत प्रतिमा होती. त्या मृत्यूसमयी ७२ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी-जावई, नातवंडं असा परिवार आहे. त्या लोकमंगल बँकेत कार्यरत राहुल कोल्हटकर यांच्या मातोश्री होत.