कासेगाव/संजय पवार : उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगे येथील हर्षवर्धन हायस्कूलमध्ये आठव्या इयत्तेत शिकणारी कु. आरोही पाठमास हिने पुणे येथे बालेवाडी क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या SFA championship 600 मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी या स्पर्धेमध्ये तिला मार्गदर्शन करणारे तिचे पालक प्रदीप पाठमास व प्रशालेतील क्रीडा शिक्षक सुरेश शिंदे, क्रीडा विभागातील शिक्षक यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी व प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी तिचे कौतुक केले.