Type Here to Get Search Results !

जागतिक लिंगायत महासभा दक्षिण तालुका अध्यक्षपदी डॉ. बसवराज नंदर्गी यांची निवड

 

सोलापूर :  दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान हतरसंग कूडल येथे जागतिक लिंगायत महासभा दक्षिण सोलापूर तालुका कार्यकारिणी गठित करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीचा प्रारंभ महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एम.के. फाउंडेशन चे अध्यक्ष महादेव कोगनूरे होते. यावेळी  बसवाचार्य मल्लिकार्जुन मुलगे यांनी लिंगायत धर्मातील अष्टावरण, पंचाचार, षट्स्थल इ.ची माहिती दिली.


जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव सरांनी संघटन शक्तीचे महत्व विशद केले. राज्य समन्वयक  विजयकुमार हत्तूरे यांनी लिंगायतांनी संघटीत होणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.या बैठकीत दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी डॉ. बसवराज नंदर्गी यांची यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम मी आपल्यासोबत असल्याचे महादेव कोगनूरे यांनी सांगितले.



या बैठकीस लिंगायत समन्वय समितीचे कार्यवाहक विजयकुमार हत्तूरे, जागतिक लिंगायत महासभा राज्य जनरल सेक्रेटरी मल्लिकार्जुन मुलगे, सोलापूर जिल्हा जागतिक लिंगायत महासभा अध्यक्ष  शिवानंद गोगाव, उद्योगपती रेवणसिद्ध बिज्जरगी, दलित मित्र नितीन शिवशरण, इतिहास तज्ञ मधुकर बिराजदार, अण्णाराव पाटील, उपाध्यक्ष शिवशरण गोविंदे, शिवराज कोटगी, बाबूराव पाटील, धर्मराज बिराजदार, सेक्रेटरी शिवानंद बाहेरमठ, जनरल सेक्रेटरी धोंडप्पा तोरणगी, कोषाध्यक्ष नागेंद्र कोगनूरे, जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ.राजश्री थळंगे अक्का, शरणप्पा पुजारी, मल्लप्पा पाटील, चन्नप्पा बगले, विजयराज केरके, भैरप्पा कोणदे, अनिकेत फताटे, राजेंद्र हौदे, शरणाप्पा मंगाळे  हनुमंत बगले, सागर नरोने,  हनुमंत सगरे, सोमनिंग वीरदे महादेव पोमाजी, श्रीमंत वागदरी, शशिकांत चांदोरे सौ.बहिरमठ अक्का व वांगी, लवंगी, हत्तरसंग कूडल आणि पंचक्रोशीतील बहुसंख्य लिंगायत बांधव उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर सर्व मान्यवरांनी संगमेश्वराचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.