ब्रह्मोत्सवानिमित्त पद्मशाली समाज बांधवांकडून पुट्टीट्टी पट्टुचिरा अर्थात माहेरची साडी अर्पण

shivrajya patra
तिरूचनूर : येथील पद्मावती अम्मावारूच्या ब्रह्मोत्सवात श्री पद्मावती पद्मशाली ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने मंगळवारी  पुट्टीट्टी पटृटूचिरा साडी अर्पण करण्यात आली. श्री पद्मावती अम्मावारूच्या मंदिरात ब्रह्मोत्सवानिमित्त सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या बांधवांकडून आलेल्या पुट्टीट्टी पट्टुचिरा अर्थात माहेरच्या साडीला देवस्थानच्या व्यवस्थापनाकडून स्विकारला व धार्मिक विधीवत पूजा केली, पुजेनंतर मंदिरात पद्मशाली समाजातील बांधवांना अभिष्ठचितन करण्यात आले.

पद्मशाली बांधवांची कन्या भगवान तिरूपती बालाजी यांची पत्नी ! या कन्येचा दरवर्षी ब्रम्हो्त्सव कार्तिकी महिन्यात होत असतो. या उत्सवात सोलापुरातील पद्मशाली समाजातील बांधवाना साडी-चोळी अर्पण करता यावा, यासाठी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त तथा पद्मशाली पद्मावती ब्रम्होत्सव समितीचे संस्थापक माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिक विधी कार्यक्रम पार पडला.

कारमपुरी यांनी तिरुचेन्नूर येथील पद्मावती मंदिर व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्कात राहून ह्या साडी-चोळी कार्यक्रमाचे नियोजन केले. गेल्या काही वर्षांपासून सोलापुरातील पद्मशाली समाजातील बांधवाना साडी-चोळी अर्पण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून देवीला साडी चोळी अर्पण करण्यात येत आहे. यंदाही उत्सवासाठी जोडप्यांनी सहभाग नोंदवला. पद्मावती देवीस पुट्टीटी पटृटूचिरा साडी अर्पण करण्यासाठी समितीच्यावतीने पद्मशाली भवन येथे आयोजित अखिल भारतीय पद्मावती समितीच्या सामुहिक कुंकुम अर्चना,आणि धार्मिक विधी कार्यक्रमास उपस्थितीनंतर सर्व समाजबांधव पद्मावती, भगवान बालाजी आणि चिरंजीव मार्कंडेय ऋषी यांचा जयघोष करीत पद्मावती ब्रह्मोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहून देवीस पुट्टीटी पटृटूचिरा साडी अर्पण केले.


यावेळी पद्मावती ब्रह्मोत्सव समितीच्या तिरूचेन्नूर मंदीर संस्थानच्या वतीने सोलापुरातील पद्मशाली समाजातील जोडप्यांना देवीच्या गर्भगृहात विशेष दर्शनाची व्यवस्था करून आशीर्वाद देण्यात आले असल्याची माहिती संस्थापक जनार्दन कारमपुरी यांनी माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी समितीचे संस्थापक जनार्दन कारमपुरी, अंबादास बिंगी, गंगाधर देवसानी, विवेक देवसानी, रोहित बिटला, नागेश सरगम, दत्तू पोसा, बालाजी दासरी, व्यंकटेश दोंता, गंगाधर देवसानी, श्रीनिवास करली, ममता दुधगुंडी, ममता बोलाबत्तीन, दामोदर पासकंटी यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते.
To Top