सोलापूर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या ७५३व्या जन्मोत्सवानिमित्त मंगळवेढ्याच्या संत भूमीतील संत साहित्याचे अभ्यासक व प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी (श्री संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष) यांचे 'श्री संत नामदेव चरित्र' या विषयावर कार्तिक शुद्ध एकादशी, गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी सायं. ५.३० ते ८ या वेळेत शिवस्मारक सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
श्री संत नामदेव शिंपी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, सोलापूर व श्री संत नामदेव शिंपी बहुउद्देशीय युवा समिती, सोलापूर यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.