राजाभाऊ सोनकांबळे यांना राज्यस्तरीय "उत्कृष्ट कामगार सेवा " पुरस्कार जाहीर

shivrajya patra
सोलापूर : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सोलापूर जिल्हा संघटनेच्या सरचिटणीसपदी नुकतीच बहुमतानी बिनविरोध निवड झालेले राजाभाऊ सोनकांबळे यांना " आधार फाऊंडेशन " सोलापूर, यांच्यावतीने  देण्यात येणारा राज्यस्तरीय " उत्कृष्ट कामगार सेवा " पुरस्कार नुकताच जाहीर झाला. रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता येथील शिवस्मारक सभागृहात थोर साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत अशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

राजाभाऊ सोनकांबळे हे जिल्हा समन्वयक :आरक्षण हक्क कृती समिती, जिल्हा सोलापूर, विभागीय सरचिटणीस: काष्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना सोलापूर, 
कार्याध्यक्ष : रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, जिल्हा सोलापूर, कार्याध्यक्ष : डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समिती. सोलापूर, सरचिटणीस : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शहर, जिल्हा सोलापूर या पदांवर कार्यरत आहेत.

राजाभाऊ सोनकांबळे यांची सामाजिक असलेली बांधिलकी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय केलेले कार्य आणि विविध प्रकारची दखलपात्र अशी केलेली अनेक कामे आजवर केली. शहर-जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरील असलेली अनेक  सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विविध महामंडळे अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या  कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने न्यायिक संघर्ष करताना, त्यांचे प्रश्न मार्गी लावून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम राजाभाऊ सोनकांबळे हे सातत्याने करीत आले आहेत. 

त्यांच्या कार्याची "आधार फाउंडेशनने " दखल घेतल्याने त्यांना यंदाच्या वर्षाचा राज्यस्तरीय " उत्कृष्ट कामगार सेवा " पुरस्कार २०२३-२४  हा पुरस्कार राजाभाऊ सोनकांबळे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आधार फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाज रत्नांना दरवर्षी पुरस्कार प्रधान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.

राजाभाऊ सोनकांबळे यांना राज्यस्तरीय " उत्कृष्ट कामगार सेवा " पुरस्कार जाहीर झाल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने तसेच सोलापूर शहर जिल्ह्यातील फुले, शाहू, आंबेडकरवादी अनेक विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांनी राजाभाऊ सोनकांबळे यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या, राजाभाऊ सोनकांबळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.
To Top