सोलापूर/०१ नोव्हेंबर : देशमुख वस्ती देगाव, येथील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी, ०१ नोव्हेंबर रोजी रात्री मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मेणबत्ती मोर्चा (कॅन्डल मार्च) काढण्यात आला.
यावेळी परिसरातील सर्व समाजबांधव, महिला, लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये सचिन देशमुख, हरी देशमुख, रवींद्र शिंदे, नूर मोहम्मद शेख, सागर घाडगे, नवनाथ देशमुख आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मराठा आरक्षण मिळेपर्यंत देशमुख वस्ती परिसरामध्ये सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचे सचिन देशमुख यांनी यावेळी सांगितले.