सोलापूर : राज्य व केंद्र सरकार विरोधी पक्ष एकत्र येऊन विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला सरसकट कुणबी-मराठा प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा येत्या काळात राज्यातील सर्व पक्षाच्या राज्यकर्त्यांना घराबाहेर फिरू देणार नाही. गनिमी काव्याने मोठे आंदोलन उभा करणार असल्याचे मनोगत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी व्यक्त केले.
मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने आज सोलापूर-पुणे महामार्गावर केंद्र सरकार राज्य सरकार ची प्रतिकात्मक चिता जाळून आंदोलन करताना मोठ्या प्रमाणावर टायर जाळून रस्ता रोखण्यात आला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ५० टक्केच्या आत ओबीसीमधून आरक्षण द्यावे, १८८१ साली मराठा समाज आणि कुणबी एकच असलेले लाखो पुरावे उपलब्ध आहेत, हे लक्षात घेऊन तात्काळ आरक्षण दिले पाहिजे, असंही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जाधव यांनी म्हटले आहे.
यावेळी निशांत सावळे, नाना शिंदे, सौदागर क्षीरसागर, मऊसाब सुरवासे, वैभव कारंडे, विनायक दत्तू, सोनू जगताप, शिवलिंग शिवपुरी, अविनाश सुरवसे, कार्तिक पाटील, राज सरडे ,पवन आलुरे, श्री सुरवसे, श्रीकांत भोसले, गणेश तांदळे, शुभम लमकाने, मारुती सूरवसे, पावन शिंदे, रामलिंग तांदुरे आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.