जिल्ह्यातील गावांची जातीवाचक नावे बदलणे व सफाई कर्मचाऱ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

shivrajya patra
सोलापूर :जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्येच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी ३०० गावांमध्ये जे विरंगुळा केंद्र सुरू आहेत, त्या विरंगुळा केंद्रात शासन निर्णयाप्रमाणे सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत का याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील पंधरा दिवसात संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घ्यावा अशा सूचना जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना देण्यात आल्या. तर जिल्ह्यातील जातीवाचक गावांची, गल्ल्यांची व रस्त्यांची नावे बदलण्याच्या अनुषंगाने ११ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयाप्रमाणे ग्रामीण भागातील १२९९ गावांची, गल्ली व रस्त्यांची नावे बदलणे, सोलापूर महापालिका क्षेत्रातील ४८ गल्ली, वस्त्याची जातिवाचक नावे बदलणे व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील ७९ गल्ली व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याबाबतचे प्रस्ताव यापूर्वीच शासनाला सादर केलेले आहेत. तरी ही नावे बदलण्याबाबत त्वरित कार्यवाही होण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या सचिवाकडे पाठपुरावा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. 

सफाई कर्मचारी व त्यांच्या पाल्यांना आवश्यक असलेल्या शासकीय योजनांचा लाभ संबंधित विभागाने तात्काळ मिळवून देण्याबाबतचे निर्देशही त्यांनी दिले.
To Top