बाजारपेठेत नव्याने पदार्पण केलेल्या ज्वेलर्सची फसवणूक बुरखाधारी महिलांनी नेल्या सोन्याच्या २ बांगड्या

shivrajya patra
सोलापूर : सराफी दुकानात सोन्याच्या बांगड्या खरेदी करण्याच्या बहाण्याने गेलेल्या ०२ बुरखाधारी महिलांनी हातचलाखीने फसवणूक करीत ०१ लाख ८९ हजार रुपयांचे दागिने नेले. ही घटना सोलापुरात, ०८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात त्या महिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर निदर्शनास आल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापुरातील व्हीआयपी रस्ता मार्गावर प्रिझम डायनोस्टीक सेंटर बाजूला 
नव्याने थाटलेल्या कल्याण ज्वेलर्समध्ये बुधवारी सायंकाळी बुरखा परिधान केलेल्या दोन महिला सोन्याच्या बांगड्या खरेदीच्या निमित्ताने आल्या होत्या. त्यांनी कल्याण ज्वेलर्स शॉपमधील काउंटर क्रमांक ०४ सेल्समन असलेल्या भोसले यांच्याकडे सोन्याचे बांगड्या दाखविण्यासाठी सांगितले.

त्यावेळी सेल्समन भोसले यांनी काही बांगड्या दाखविल्या, दाखविलेल्या बांगड्या त्या महिलांना आवडल्या नाहीत, आणखी दुसऱ्या बांगड्या दाखवा, असे म्हटले, तेव्हा सेल्समन भोसले हे दुसऱ्या बांगड्या काढण्यासाठी खाली वाकले, तेव्हा त्यांनी काही बांगड्यापैकी त्यातील दोन बांगड्या घेऊन बुरख्यामध्ये लपविल्या आणि आम्ही आमचे जुने सोने आणतो, असे म्हणून सोन्याचे बांगड्या हातचलाखी करून फसवणुकीच्या इराद्याने घेऊन निघून गेल्या. 

त्यात कलकत्ता वर्क असलेले डिझाईनचे सुमारे ३२ ग्रॅम वजनाचे २२ कॅरटचे सोन्याच्या दोन बांगडया फसवणूक करण्याच्या इराद्याने घेऊन निघून गेल्या. त्या महिलांनी फसवणुकीने नेलेल्या बांगड्यांची किंमत ०१ लाख ८९ हजार रुपये असल्याची सांगण्यात आले.


सदर घटना ही कल्याण ज्वेलर्स शॉपमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आली, असल्याची फिर्याद कल्याण ज्वेलर्सचे मॅनेजर अजीत देवराजन शोभाण्णा (रा- संकल्प हाईटस, रू. नं. ५०१, मोदी कब्रस्तान जवळ, सोलापूर) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक माळी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
To Top