सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी, २५ नोव्हेंबर रोजी पहाटे अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व सिताराम तांडा येथील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकल्या. या छाप्यात ०८ गुन्हे नोंदविण्यात आले.
मुळेगाव तांडा व सिताराम तांडा येथील वेगवेगळ्या हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून पथकाने १७, ९५० लिटर रसायन जप्त करुन जागीच नष्ट केले. पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन ०५ आरोपी पलायन करण्यात यशस्वी झाले. त्यांना फरार घोषित करण्यात आले असून त्यांचा शोध तपास अधिकारी करीत असल्याचेही नितिन धार्मिक यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरिक्षक सदानंद मस्करे, राहूल बांगर, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, अक्षय भरते, मानसी वाघ, रोहिणी गुरव, कृष्णा सुळे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अशोक माळी, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, वाहनचालक रशिद शेख, दिपक वाघमारे आणि संजय नवले यांनी पार पाडली.
........ आवाहन .........
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती/वाहतूक/विक्री/साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केलं आहे.