Type Here to Get Search Results !

एशियन पेंट्स कंपनीकडून डिलरशीप देतो; असे सांगून ०८ लाख रूपयांची फसवणूक


सोलापूर : एशियन पेंट्स कंपनीकडून डिलरशीप देतो, असे सांगून पराग सुरेश डुबे-पाटील (वय-२७ वर्षे) यांची ०८ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आलीय. हा प्रकार ०१ ते १४ सप्टेंबर२०२३ दरम्यान घडला. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात शनिवारी, ०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शहर पोलीस माहिती कक्षातून सांगण्यात आले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील सात रस्ता वरदा अपार्टमेंटमधील रहिवासी पराग सुरेश डुबे पाटील, राहते घरी फिर्यादी हे त्यांच्या मोबाईलवरून ऐशियन पेन्ट लिमिटेड कंपनीचे डिलरशीपसाठी ऑनलाईन माहिती बघत होते. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी दरम्यान एशियन पेन्ट कंपनीकडूनवरील नमुद ईमलव्दारे, मोबाईलवरून, लॅडलाईन फोन वरून फिर्यादीस सदर कंपनीची डीलरशीप देतो, म्हणून आवश्यक असणारे कागदपत्रे मागण्यात आली.

त्याप्रमाणे पराग डुबे-पाटील़ सर्व कागदपत्राची पुर्तता केली. त्यानंतर फिर्यादीला वेळोवेळी रजिस्टेशन फी, सेक्युरेटी डिपॉजीट असे एकूण ०८ लाख रूपये फिर्यादीकडून घेऊन फिर्यादीस ऐशियन पेन्ट कंपनीचा माल व मिक्शीन मशीन पाठविण्यात आली नाही. त्यानंतर पराग डुबे-पाटील यांनी वारंवार ई-मेल वरून व फोनवर संपर्क केला असता, त्यांच्याकडून कोणताही माल अथवा फिर्यादीचे पैसे परत आले नाहीत, त्यावेळी त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे पुढे आले.

त्यानंतर पराग डुबे-पाटील यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार dealership@asinnasianpaintsdealerships.co, ९०४०९३०९८१ च्या क्रमांकाचा मोबाईल धारक, ८०६६१८७१३१ चा मोबाईल धारक, लॅड लाईन क्रमाक +९१२२-४१४८३८७० चा धारक, फेडरल बँकेचा खाते क्र. ९९९८०१२१३५३६६३ चा खातेधारक आणि फेडरल बँक खाते क्र. १९१८०१०००३७१४१ चा खातेधारक (ब्रॅन्च :सांताक्रुज कलीना, मुंबई) यांच्याविरुद्ध भादविसं ४२०,३४, मा. तंत्रज्ञान अधि. ६६ (अ) (ब), ६७,६८ प्रमाणे शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. दुय्यम पोलीस निरीक्षक धायतोंडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.