सोलापूर : संविधान दिनाचे औचित्य साधून जिव्हाळा मतिमंद आणि गतिमंद मुलांसोबत वालचंद महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाकडून संविधान दिन साजरा करण्यात आला. वालचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी प्रेरणा बनसोडे प्रतीक्षा शिंदे आणि ऋत्विक सोनकांबळे या समाजशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाजात गतिमंद आणि मतिमंद असणाऱ्या मुलांसोबत संविधान दिन साजरा करून अनोख्या पद्धतीने संविधान दिन साजरा केला.
प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिव्हाळा गतिमंद आणि मतिमंद शाळेत मुलांसाठी त्यांच्या आय क्यू नुसार त्यांना ड्रॉइंग बुक आणि कलर बुक व सर्व प्रकारचे शालेय साहित्य आणि त्याचबरोबर त्यांना खाऊ वाटप करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वालचंद महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागाचे प्रेरणा बनसोडे, प्रतीक्षा शिंदे, ऋत्विक सोनकांबळे, विशाल घंटे, स्मृति वडवेराव, सुकन्या रामनवरे,गजला शेख,आतिश सोनवणे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा बनसोडे यांनी तर प्रतिक्षा शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.