सोलापूर : ०१ जानेवारी २०२४ रोजीपासून छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुननिरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मतदार यादी निरीक्षक म्हणून, ०३ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्ष यांची नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर याठिकाणी सकाळी १० वाजता बैठक आयोजित केलेली आहे.
या दरम्यान सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचा ही निवडणुक कामकाजाचा आढावा घेऊन मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत. याबाबत मतदार यादी संदर्भात नागरिकांना काही सूचना असल्यास शनिवारपर्यंत dydeosolapur@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.