Type Here to Get Search Results !

पिक कर्ज सक्तीची वसुली त्वरित थांबवावी; अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात पाऊल ठेऊ देणार नाही : गणेश इंगळे


माळशिरस : शिवसेना व युवासेना सचिव वरून सरदेसाई व युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे व युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके यांच्या नेतृत्वाखाली माळशिरसचे नायब तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन देण्यात आले.

सद्या सोलापूर जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पडलेला पाऊस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न विजेचा लपंडाव अवकाळी पाऊस अशा चौफेर संकटात शेतकरी राजा सापडला असताना सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार हे ऊसाच्या बिलातून शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसूल करून पाटबंधारे खात्यास देत आहेत.

शेतकऱ्यांचे पिक कर्ज बँका सक्तीने वसूल करीत आहेत. ग्रामपंचायत नगरपरिषद शेकऱ्यांची पाणी पट्टी घरपट्टी सक्तीने वसूल करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे व सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्याच्या भयानक दुष्काळी परिस्थितीचा विचार करता सदरची कपात किंवा वसुली कारखानदारांनी आणी बँक वाल्यांनी त्वरित थांबवावी अन्यथा पालक मंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा युवा सेने कडून दिला.

यावेळी निवेदन देताना शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव बंडगर, युवा सेना विधानसभा तालुका प्रमुख मयूर सरगर, शिवसेना शहर प्रमुख माळशिरस अशोक देशमुख, युवा सेना उप तालुका प्रमुख दत्ता साळुंखे, रामभाऊ कचरे, युवराज पवार, दत्तात्रय काशीद इ. शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते .