सोलापूर : श्री दिगंबर मुनीनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने पूर्व विभागातील कुचन नगर येथील श्री सुशीलअम्मा मठात कार्तिकी एकादशीनिमित्त बंधू भगिनी गुरुभक्तांनी श्रीविष्णू कारमपुरी (महाराज) व श्रीनिवास कुसुरकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दीपोत्सव साजरा करण्यात आला.
श्री दिगंबर मुनीनाथ भजनी मंडळाच्या वतीने कुचन नगर येथील सुशीलअम्मा मठात कार्तिकी एकादशी निमित्त दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रारंभी श्री दिगंबर मुनीनाथ महाराज आणि गुरुमाऊली श्री सुशीलअम्मा यांच्या मूर्तीचे महाअभिषेक व महाआरती करण्यात आली, त्यानंतर एक सहस्त्र सोळा दीप लावून दीपोत्सव कार्यक्रम करण्यात आला.
विष्णू कारमपुरी व श्रीनिवास कुसुरकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमास श्रीनिवास चिलवेरी, नागनाथ कारमपुरी, नंदा मादास, यमुना पिसका, कविता कैरमकोंडा, कलावती कुसुरकर, सुनंदा कुसुरकर, नागार्जुन कुसुरकर, श्रीकांत कुसुरकर यांच्यासह गुरुभक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोओळी :
श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने सुशील अम्मा मठात कार्तिकी एकादशीनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम करण्यात आले. याप्रसंगी श्रीनिवास कुसुरकर, सुनीता कुसुरकर, नंदा मादास, यमुना पिसका आदी भाविक दिसत आहेत.