स्वरध्यास संगीत विद्यालयाची गुरुवारी दिवाळी संध्या

shivrajya patra
सोलापूर : येथील स्वरध्यास संगीत विद्यालयातर्फे गुरूवारी, ०९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५.३० वा. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात (अँम्फी थिएटर) दिवाळी संध्या या कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम अगदी वेळेत सुरू होणार असून तो सर्वांसाठी खुला असल्याची माहिती संयोजिका रसिका कुलकर्णी यांनी दिली. 

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर या कार्यक्रमात अनेक गाण्यांचे सादरीकरण होणार आहे. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन  त्यांनी केलं आहे.
To Top