सोलापूर : येथील श्री.जांबमुनी प्रतिष्ठान, लष्कर चे संस्थापक अध्यक्ष कै. शाम (पैलवान) चन्नापागोलु यांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठान व मित्रपरिवाराच्या रक्तदान शिबिर घेण्यात आले. सोलापूर रक्तपेढीच्या सहकार्याने पार पडलेल्या शिबिरात 51 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
लष्कर विभागात प्रकाश आणि बापूजी हौसिंग सोसायटीच्या श्री गणेश हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात रक्तदाते आणि समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. सांयकाळच्या सत्रात लष्कर विभागामध्ये अन्नदान कार्यक्रम घेऊन सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
हा कार्यक्रम लष्कर विभाग, जीवनदीप मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. योगेश पल्लोलु यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जांबमुनी प्रतिष्ठानचे आधारस्तंभ सिद्धलिंग म्हेत्रे, मार्गदर्शक विशाल सायबोळू, अध्यक्ष दशरथ आरगोळु, उपाध्यक्ष शंकर म्हेत्रे, सेक्रेटरी प्रशांत म्हेत्रे, खजिनदार वासु म्हेत्रे, गोंविद म्हेत्रे, प्रकाश म्हेत्रे, नरेंद्र गोपीरेडी, सचिन शिंदे, किशोर म्हेत्रे, मारूती म्हेत्रे, नरसिंह दिडी, पेत्रराज चन्नापागोलु, दतुप्रसाद म्हेत्रे यांच्या पुढाकाराने व सोलापूर रक्तपेढीचे मल्लुबाबा म्हेत्रे, रमेश बेरे, विघ्नेश गोडलोलु, आनंद पुंडा यांच्या परिश्रमातून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.