झाडे व पाणी हे मानवाचे जीवन : डॉ. बी. बी. राऊत

shivrajya patra


सोलापूर : पर्यावरणात झाडं आणि पाणी याला अनन्यसाधारण महत्व आहे. झाडे व पाणी हे मानवाची जीवन आहे, असे उद्गार सोशल महाविद्यालयामध्ये भूगोल अभ्यास मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर भूगोल विभागाचे डॉ. प्रा. बी. बी. राऊत  प्राध्यापक भूगोल विभाग यांनी काढले,
सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज भूगोल विभाग भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन डॉ. बी. बी. राऊत यांच्या हस्ते झाडांना पाणी घालून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  आय. जे. तांबोळी होते.

आज पृथ्वी व सजीव सृष्टी व पाणी वाचवण्याचे नितांत गरज आहे. हे करण्यासाठी भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांनी जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही डॉ. प्रा. बी. बी. राऊत यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. एस. ए. राजगुरू (भूगोल विभाग प्रमुख) यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. डी. एस. नारायणकर यांनी करून दिला. मानव व पर्यावरण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी यांनी आपल्या मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.  एम. डी. शेख व डॉ. मोमीन मॅडम यांनी केले, तर सरते शेवटी अल्फीया सुगुर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

फोटो ओळी : 
भूगोल अभ्यास मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी झाडाला पाणी घालताना प्रमुख पाहुणे डॉ. बी.बी. राऊत, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आय. जे. तांबोळी, भूगोल विभाग प्रमुख डॉ. एस. ए. राजगुरू, डॉ.  डी. एस.  नारायणकर, डॉ. एम. डी. शेख व डॉ. मोमीन मॅडम छायाचित्र दिसत आहेत.
To Top