माजी केंद्रीय मंत्री शिंदे आणि श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती
सोलापूर : सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ, एस. एस. ए. आर्टस कॉमर्स महाविद्यालय आणि इंडियन युथ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार स्व. लतीफ नल्लामंदू यांच्या कार्याचा आलेख असलेल्या " शम-ए-कासिद - " संपादन डॉ . शफी चोबदार [उर्दू ] "अ. लतीफ नल्लामंदू : व्यक्तित्व व कर्तृत्व " संपादन प्राचार्य इक्बाल तांबोळी व प्राचार्य शकील शेख [ हिंदी-मराठी-इंग्रजी लेख संग्रह] अशा दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ मंगळवारी, १० ऑक्टोबर रोजी सकाळी १०. ३० वा "डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृह " सोशल महाविद्यालय किडवाई चौक, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे असतील, असे संयोजकांनी सांगितले.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन तर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकीहाळ , अभा उर्दू कॉन्फ्रसचे अध्यक्ष यु. एन. बेरीया, उद्योगपती दत्ता अण्णा सुरवसे , बिझनेस एक्प्रेसचे ए. आय. मुजावर, खादिमाने उर्दू फोरमचे अध्यक्ष विकार शेख, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सौ. शुभदा कुलकर्णी व रईसा मिर्जा या दोन प्राध्यापिकांना " आदर्श शिक्षक " म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तरी सर्व साहित्य प्रेमींनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा. पी. पी. कुलकर्णी, अय्यूब नल्लामंदू , प्राचार्य इ. जा. तांबोळी, मजहर अल्लोळी यांनी केले आहे.