शासनाच्या योजना तळा-गाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आनंद गोसकी नेहमीच कार्य मग्न : आमदार विजयकुमार देशमुख

shivrajya patra
सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या व राज्य शासनाच्या विविध योजना वेळोवेळी तळा-गाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आनंद गोसकी नेहमीच कार्यमग्न असतात, असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगून आनंद गोसकी यांच्या कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं माध्यम बनून आनंद गोसकी कार्य करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून साखर पेठेत भारतीय जनता पार्टी शहर उत्तर च्या वतीने रविवार पेठेतील विणकर बागेसमोर रविवारी, o८ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने साखर पेठ परीसरात प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थांना गॅस, शेगडी, रेग्युलेटर किट, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून स्वनिधी योजनेंतर्गत छोट्या व्यावसायिकांना धनादेश वाटप, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे एक हजार लाभार्थांचे गोल्डन कार्डचे प्रातिनिधीक स्वरूपात आमदार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी भागातील ज्येष्ठ मोहन कनकी, बुरबुरे काका, महेश दासी, शुभम मिठ्ठा, दिनेश श्रीकोंडा, आनंद गोसकी मित्र परीवारातील सदस्य आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top