सिद्धेश्वर प्रशालेला राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धेत सुवर्णमय यश

shivrajya patra


सोलापूर : सिद्धेश्वर प्रशालेचा सुवर्ण विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रकला विभागाला सुवर्णमय यश प्राप्त झाले आहे. अवंतिका नॅशनल लेव्हल आर्ट कॉम्पिटिशन न्यू दिल्ली, यांच्यामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या या नॅशनल लेवलच्या चित्रकला परीक्षेत प्रशालेने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. 

१०  गोल्ड मेडल ०७ सिल्व्हर मेडल ०७ ब्रॉंझ मेडल असे एकूण २४ मेडल प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत.  ह्या  सन्मानात चित्रकला शिक्षक प्रशांत बिलगुंदी यांचा मोलाचा वाटा आहे.  प्रशालेच्या या यशप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशांत बिलगुंदे सर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
To Top