सोलापूर :
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या आदेशानुसार शुक्रवारी, ०६ ऑक्टोबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे ०५ वे कुलगुरू म्हणून डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती झालेली असून डॉ.महानवर हे आपल्या कुलगुरू या पदाचा कार्यभार घेण्याअगोदर आज सकाळी १०.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर येथील विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यास त्यांच्या कुटुंबासमवेत पुष्पमाला अर्पित करून अभिवादन केले.
त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारीच असलेल्या ऑडिओ आणि व्हिडिओ लायब्ररीला सदिच्छा भेट देऊन ऑडिओ आणि व्हिडिओ लायब्ररीच्या माध्यमामधून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेसाठी राबविण्यात येणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाची सविस्तर माहिती राजरत्न फडतरे यांनी कुलगुरू यांना दिल्यामुळे त्यांचे भरभरून कौतुक केले.
यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन निर्माण कृती समितीने असे स्तुत्य उपक्रम राबविल्याने पु.अ.होळकर सोलापूर विद्यापीठ आणि संविधान भवन यांच्यासोबत अभ्यास क्रमाविषयक सामाजिक करार करून असे विविध अनेक उपक्रम पु.अ.होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत राबविण्याचे कुलगुरू यांनी आपला मानस व्यक्त केलेला आहे.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन निर्माण कृती समितीच्या वतीने सरचिटणीस राजरत्न फडतरे, कार्याध्यक्ष राजाभाऊ सोनकांबळे, प्रसिद्धी प्रमुख गौतम मसलखांब यांनी नवनियुक्त कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर आणि त्यांच्या सौभाग्यवाती यांचे स्वागत केले.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन निर्माण कृती समितीचे सरचिटणीस राजरत्न फडतरे, कार्याध्यक्ष राजाभाऊ सोनकांबळे, प्रसिद्धी प्रमुख गौतम मसलखांब, प्रा.खरे, विद्यापीठाचे उपकुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, रवी हुक्केरी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.