कासेगांव/संजय पवार :
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं, या मागणीसाठी रणशिंग फुंकून उभा महाराष्ट्र ढवळून काढत असलेले संघर्षयोध्दा मनोज जरांगे-पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांचे ०५ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगांव येथे दुपारी १२.३० वा. भव्य स्वागत करण्यात येणार असून यावेळी दक्षिण व उत्तर तालुक्यातील बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज दक्षिण व उत्तर सोलापूरच्या वतीने करण्यात आले आहे.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची जिल्हास्तरावर सोलापुरात ०५ ऑक्टोबर रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी त्यांच्या २ दिवसीय दौऱ्यात तालुकास्तरावरील ४ जाहीर सभासह ५ सभा होणार आहेत.
त्याचा प्रारंभ सोलापुरातील जाहीर सभेने होत आहे. त्यांची दक्षिण सोलापूर तालुक्याच्या कासेगांव, ऊळे, तामलवाडी या भागातून दौरा होणार असल्याने तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने गुरुवारी, ०५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० स्वागत करण्यासाठी उळेगांव येथे तमाम समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. संजय जाधव यांनी केले आहे
या परिसरातील उळे, कासेगाव, गंगेवाडी, होनसळ, राळेरास, तरटगांव, वडजी, वरळेगाव, बक्षी हिप्परगे, दोड्डी, मुळेगांव, बोरामणी येथील समाज बांधवानी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोलापूर सकल मराठा समाज बांधव, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिव छत्रपती शिवाजी महाराज विचार मंच, मुस्लिम विचार मंच यांनी केले आहे.