सोलापूर : देशात अनेक चॅनेल्स आहेत, यातील बहुतांश चॅनलवर त्याच-त्याच न्यूजचं प्रसारण करून टीआरपी वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात, पण सोलापुरातील
पूर्व भागातील स्वरांजली चॅनेल १० वर्षापासून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजोपयोगी धार्मिक कार्यक्रमासह समाजाच्या विविध अंगांना प्रोत्साहित करण्यासाठी नेहमी अग्रेसर असते. त्याचबरोबर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी जनांचा गौरव सत्कार करून त्यांना समाज कार्य करण्यास प्रेरणा देत आहे, असे गौरवोद्गार काशीपीठाचे जगद्गुरू १००८ श्री श्री श्री डाॅ.मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
ते शुक्रवारी स्वरांजली चॅनेलच्यावतीनं आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.एमआयडीसी येथील अंबिका मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष माजी महापौर महेश कोठे होते.
यावेळी सोलापुरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्याचा सन्मान जगद्गुरूच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये व्यापार, शैक्षणिक व समाजसेवा कार्याबद्दल सराफ व्यापारी सुरेश जनार्दन बिटला, मेडिकल क्षेत्रातील उपकरणं निर्मितीबद्दल पुर्वा डिस्ट्रीब्युटर्सचे संचालक श्रीधर रामचंद्र वडनाल, वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. श्रीकांत दत्तात्रय माकम, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महादेव कोगणुरे, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दत्तात्रय सिंगम, शैक्षणिक, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शंकर सोमण्णा चौगुले, व्यवसायात उल्लेखनीय कार्याबद्दल महेश फ्लस्टिकचे संचालक गणेश बुधारम, संस्था व शैक्षणिक व समाजकार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शांतय्या स्वामी, बॅंकीग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल निलकंठ बॅंकेचे चेअरमन चंद्रकांत तापडिया, क्रिडा व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय सावंत, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रा.नरेंद्र गुंडेली आणि समाजसेवा कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघमचे अध्यक्ष माधवी अंदे यांचा स्वरांजली सन्मानचिन्ह,फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत स्वरांजली चॅनेलचे संस्थापक दयानंद मामड्याल यांनी केले.
प्रारंभी डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते व्दिपप्रवलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तद्नंतर डॉ. मल्लिकार्जुन तरनळ्ळी सपत्नीक महास्वामींजीचं पाद्यपूजा केली. यावेळी महास्वामींच्या हस्ते दिपोत्सव २०२३ व पद्मशाली युवक संघटना व स्वरांजली चॅनेलच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या पद्मकट्टा या कार्यक्रमाचे लोगो अनावरण करण्यात आले. यानंतर पुरस्कार विजेत्यावर तयार करण्यात आलेला माहितीपट एलईडीद्वारे दाखवून पुरस्कारकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी महापौर महेश कोठे यांनी स्वरांजली चॅनेलच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे समाजातील चांगलं कार्य करणाऱ्यांना प्रेरणा मिळते, असं गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का यांनी पुर्व भागासह देश विदेशातील पद्मशाली समाजातील विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना प्रकाशात आणण्यासाठी पद्मकट्टा हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात २०२२ दिपोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघमचे अध्यक्ष वेणुगोपाल जिल्ला पंतुलू, सरचिटणीस देविदास कुरापाटी आणि शहर अध्यक्ष देविदास यंगलदास यांच्यासह पौरोहित्यांचा सत्कार जगद्गुरूच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोपाळ मुडदिड्डी आणि सौ. रेणुका बुधारम यांनी केलं. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वरांजली चॅनेलचे प्रमुख व्यंकटेश दोंता, डॉ. मल्लिकार्जुन तरनळ्ळी, पत्रकार इरण्णा जुजगार, व्यवस्थापक श्रीमंत वाडीकर, सिटी न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख संतोष पवार, साईराम श्रीचिप्पा, भावना आमंची, लावण्या मिठ्ठा, सत्यनारायण गड्डम, सत्यनारायण गुर्रम, सोमनाथ येरगुंटला, प्राची गोली, अंबादास मंगलपल्ली, गिरीश गोसकी, कॅमेरामन प्रकाश कुरापाटी, पुरुषोत्तम बुधारम, राजू चिल्लमपुरी, सौ.रूपा मामड्याल, सौ.उमा दोंता, आदींनी परिश्रम घेतले.