एजाज अहमद अब्दुल हमीद चौकी आयटा आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

shivrajya patra
 

ठाणे : जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुंबईस्थित इस्माईल बेग मोहम्मद हायस्कुल मधील एजाज अहमद चौकी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अखिल भारतीय आदर्श शिक्षक संघातर्फे यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

एजाज अहमद चौकी सर गेली ३४ वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सोलापूर येथील सुमारे ४० ते ४५ शाळांमध्ये दहावी, इंग्रजी विषयाची तयारी कशी करावी, याबद्दल मार्गदर्शन करीत आहेत. त्यांनी एस.एस.सी. बोर्ड मुंबई येथे मुख्य सरपरिक्षक व पेपर सेटर म्हणून ही काम पाहिले आहे.

त्यांच्या सर्व सेवांचा गौरव म्हणून त्यांना अखिल भारतीय आदर्श शिक्षक संघातर्फे यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा,  
जागतिक शिक्षक दिनी, ०५ ऑक्टोबर रोजी मन्नत हॉल, मुंब्रा येथे पार पडला. या प्रसंगी आयटा चे अध्यक्ष श्रीमान सय्यद शरीफ, 'गुलबोटे' चे संपादक फारुक सय्यद आणि प्राचार्य झियाउर रहमान अन्सारी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शरीफ भागनगरी यांनी एजाज चौकी यांचे अभिनंदन केलं आहे.
To Top