संघर्ष योद्धा जरांगे-पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठवाडी येथे प्रवेश बंदी निर्णयासह साखळी उपोषण

shivrajya patra

अक्कलकोट : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तालुक्यातील मौजे मराठवाडी येथे रविवारी, २९ ऑक्टोबर रोजी हनुमान मंदिरसमोर उपोषणास प्रारंभ करण्यात आला. 

मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही, असा प्रवेश बंदीचा फलक मराठवाडी या गावात मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थकांनी गावाच्या वेशीजवळ लावलाय. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना मराठवाडी या गावात प्रवेश बंदीचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.

संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ रविवारी सकाळी हनुमान मंदिरासमोर साखळी उपोषण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित होते. सकल मराठा आयोजक रणजीत गुळवे, दशरथ गायकवाड, लहू गुळवे, तुळजाराम गाजरे, धनंजय निंबाळकर, विष्णू जाधव, मधुकर पवार, भगवंत जाधव, जगन्नाथ गुळवे, राजेंद्र जाधव, बंडू पवार, राहुल पाटोळे, मनोहर कुसेकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते

To Top