खळबळजनक... ! बंदुकीच्या १२ काडतुसांची चोरी

shivrajya patra
                                    ( प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर : अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाजाचे कडी- कोंयडा तोडून घरातील तिजोरीत ठेवलेली १२ बोअर बंदुकीची १२ काडतुसे चोरून नेली. ही खळबळजनक घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे गावात २७ ऑक्टोबरच्या दुपारपूर्वी घडली. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्तालय माहिती कक्षातून सांगण्यात आले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दहिटणे- शेळगी रस्त्यावर स्वराजसिंग रघुवीरसिंग गौर यांची शेतजमीन आणि राहतं घर आहे. कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्या बंद घराचे दरवाजा व लोखंडी ग्रीलचे दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील लोखंडी तिजोरीचे लॉकर उचकटून लॉकरमधील बारा बोअर बंदुकीच्या १२ काडतुसांची (बुलेट्स) चोरी केली. हा प्रकार २२ ऑक्टोबरची सकाळ ते २७ ऑक्टोबरच्या दुपारदरम्यान घडली.

घरात चोरी झाल्याचा प्रकार दिसून आल्यावर स्वराजसिंग रघुवीरसिंग गौर यांनी रविवारी, २९ ऑक्टोबर च्या सायंकाळी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात प्रिया दाखल केली. चोरीस गेलेली काढत असे सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीची होती असं सांगण्यात आलंय. त्याची सरकारी किंमत ४, ८० रुपये आहे. पोहेकॉ/१०७६ पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
To Top