सोलापूर : विदर्भ कोकण ग्रामीण बँक सोलापूर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत भारत सरकार चे उपक्रम "स्वच्छता ही सेवा 3.0" चे आयोजन क्षेत्रीय प्रबंधक रमेश खाडे यांच्या मार्गदर्शनानुसार माता रूपाभवानी मंदिर येथे हा उपक्रम घेण्यात आला. त्यास बँकेचे ४२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत सर्व परिसर स्वच्छ करण्यात आले.
यासाठी खाडे यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयाचे संतोष भोसले, महेश मोरे, चैतन्य कुलकर्णी, सोलापूर शाखा प्रबंधक शरद सावंत, जुळे सोलापूर शाखेचे प्रबंधक सत्यप्रकाश मेहता, कुंभारी शाखेचे वरिष्ठ प्रबंधक दमाह, करजगी शाखेचे प्रबंधक हेबळे, कामती शाखेचे प्रबंधक पाटील, औराद शाखेचे प्रबंधक साखरे साहेब, उळे शाखेचे प्रबंधक चिप्पा तसेच कु. जाधव, कु. लोकरे, दूधभाते, दिपक गांगुर्डे, बालाप्रसाद शर्मा, जी. पी. पाटील, मेघराज, चवरे, सर्फराज सगरी, एल. एस. क्षीरसागर, हुसेनी शेख, अरुण बस्ते, इर्शाद शेख, नावेद शेख, लतीफ शेख, अमोल बनसोडे, विठ्ठल गायकवाड, सर्फराज शेख यांच्यासह सेवानिवृत्त स्टाफ चिप्पा, चंदनशिवे, घोडके यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.