६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना

shivrajya patra
 

सोलापूर/२४ ऑक्टोबर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन लाखो बंधू भगिनी यांनाही दीक्षा दिली. आजच्या ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी समता सैनिक दल, शाक्य आणि सिदनाक ब्रिगेडच्या वतीने नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनिल खमीतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नॉर्थकोट प्रशाला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळापर्यंत संचलन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर समता सैनिक दल, शाक्य संघ आणि सिदनाक ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने      मानवंदना देण्यात आली.  यावेळी निवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, आगवणे साहेब, समता सैनिक दलाचे जी ओ सी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव, शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके, सिदनाक ब्रिगेडचे प्रमुख नाईक जयानंद कांबळे हे प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी समता सैनिक दलाचे महासचिव अनिल जगझाप, प्राचार्य वसिष्ठ सोनकांबळे, चित्तरंजन सातपुते, विकी जाधव, अंकुश बनसोडे, बापू गायकवाड, महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष सुमित्रा जाधव, प्रिपोवेल, प्रज्वल डोळसे, रत्नदीप कांबळे, प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, यशपाल आखाडे, शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेखर वाघमारे, मिलिंद कोरे, गोपीनाथ कांबळे, ईश्वर मसलखांब, अशोक सोनवणे, के पी सुरवसे, नाना गाडे, राजेंद्र हजारे  यांच्यासह ५० निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महार रेजिमेंटचे  सैनिक नाईक जयानंद कांबळे, कमलाकर कांबळे, रामचंद्र माशाळे, भाऊसाहेब वंजारी, विद्याधर ढोणे, संगप्पा शिंदे, सूर्यकांत गजधाने, गणेश कांबळे, चंद्रकांत बनसोडे, विष्णू वाघमारे, प्रमोद जाधव, सुरेश खरसुदे, शिवाजी गायकवाड, शंभुदेव सुरवसे, शिवाजी सुरवसे, शहाजी देहडे, महेश गायकवाड, गुंडू केंगार, मधुकर माने,सत्यवान वाघमारे, सदाशिव पट्टद, राहुल साबळे, पंडित व्हनमाने, सुरेश गेजगे इत्यादी उपस्थित होते.
To Top