सेवा पंधरवड्यानिमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात झाले विविध कार्यक्रम : आ. देशमुख

shivrajya patra

सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत भाजपच्या वतीने देशभर सेवा पंधरवडा सप्ताह म्हणून राबवण्यात आला. यानिमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण मतदारसंघात विविध कार्यक्रम घेत शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या.

भाजपच्या वतीने १७ ते २४ सप्टेंबर दरम्यान दक्षिण विधानसभा भागात ५ ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. ३८४ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. याशिवाय मतदारसंघात विविध ठिकाणी सहा ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याचा एकूण ७६० जणांनी याचा लाभ घेतला.

 यामध्ये ३०८ पुरुषांची तर  ४६२ महिलांची तपासणी करण्यात आली. तसेच दक्षिण सोलापूर ग्रामीणमध्ये २४४ तर दक्षिण पूर्व मंडल मध्ये ६३५ लोकांचे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्ड काढण्यात आले. २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती ८६ ठिकाणी साजरी करण्यात आली. यामध्ये सुमारे हजार कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. याशिवाय मतदारसंघात ३० ठिकाणी स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आले. यामध्ये जवळपास दोन हजार लोकांनी सहभाग नोंदवला खूद्द स्वतः आमदार सुभाष देशमुख यांनी विविध ठिकाणी उपस्थिती दर्शवत स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला. वस्ती संपर्क अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वस्त्यावर आ.सुभाष देशमुख यांनी जनसंपर्क केला. मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ९ वर्षाच्या काळातील विविध घेतलेल्या निर्णयावर आधारित नमो प्रदर्शनी चे देखील आयोजन करण्यात आले होते.

चौकट
प्रदेश भाजपच्या सूचनेप्रमाणे सेवा पंधरवडानिमित्त मतदार संघात विविध कार्यक्रम राबवण्यात आले. नमो प्रदर्शनी च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. यापुढेही असेच कार्यक्रम सुरू राहतील, असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.
To Top