शिवकालीन प्रदर्शनास लाखो सोलापूरकरांनी नोंदविला सहभाग

shivrajya patra

सोलापूर : गोकुळ दूध आयोजित शिवकालीन ५०० शस्त्रांचे मोफत प्रदर्शन सोलापूरकरांनसाठी गोविंद श्री मंगल कार्यालय मध्ये भरवण्यात आले होते. दि.५ व ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ८ वाजे पर्यंत या कालावधीत घेण्यात आले, खूप दुर्मिळ अशे शस्त्र व इतिहास कालीन वस्तूंचे फार मोठा संकलन या प्रदर्शनात नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते.

धोप तलवार, जाफराबादी तलवार, मराठा तलवार, मोगल तलवार, रजपूत तलवार, इंग्रज तलवार, फिरंगी तलवार खांडा तलवार, तेगा तलवार व इतर प्रकार च्या तलवारी, मराठा कट्यार, मोगल कट्यार, बच्चा कट्यार व सैनिकी कट्यार. दिल्ली शाही कट्यार व विजय नगरी कट्यार, हत्ती च्या काताड्याची ढाल, कासवाच्या पाठीची ढाल, लोखंडी ढाल, व धातूंची ढाल, तोफेचे दगडी गोळे, खंजीर, बिचवा, जांबिया, कुकरी, अडकित्ते, दरबारी भाला, पायदळ  भाला,  घोडेस्वार भाला, अश्वकुंज भाला व सांग भाला, विटा, शिरस्थान, अंकुश, शिक्षा देण्याची कुऱ्हाड फरशी कुऱ्हाड, गुप्ती, चिलमन, ऐतिहासिक व इतर प्रकार चे कुलूप अशीअनेक प्रकारचे शस्त्र होती.व जुन्या काळातील इतर वस्तू या ठिकाणी पाहण्यास मिळाले. 
दोन दिवसांच्या काला वधित करियर अकॅडमी, ज्ञानसंपदा प्रशाला,भारतीय विद्यापीठ हायस्कूल माध्यमिक उच्च माध्यमिक,जय जवान जय किसान हायस्कूल, छत्रपती शिवाजी शाळा प्राथमिक माध्यमिक, सोनामाता शिक्षण संस्था, भीम मेहता माध्यमिक शाळा, एस पी शिक्षण मंडळ, नूतन मराठी शाळा, मनपा प्राथमिक माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग, भैरू रतन दमानी अंधशाळा, सुरवसे हायस्कूल, अण्णासाहेब पाटील प्रशाला, स्वर्गीय चंद्रम गुरुजी शिक्षण संस्था, हरीभाई देवकरण प्रशाला, शरदचंद्र पवार हायस्कूल, छत्रपती शिवाजी प्रशाला, शांती इंग्लिश मीडियम स्कूल, आप्पासाहेब काळातील चित्रकला महाविद्यालय, संगमेश्वर जूनियर व सीनियर महाविद्यालय, यशोधरा हायस्कूल व महाविद्यालय, वसुंधरा प्राथमिक व माध्यमिक प्रशाला अशा विविध शाळा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील मुले मुली शिक्षक व सामान्य नागरिक खेळाडू विविध क्षेत्रातील व्यापारी , सार्वजनिक मंडळ व सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने या प्रदर्शनात सहभागी होऊन दुर्मिळ अशा शस्त्रांचा संकलन पाहून आनंद व्यक्त केला. सदर प्रदर्शनाचा समारोह भालेभाजीचा व तलवारबाजीचं प्रात्यक्षिक व लहान मुलांच्या शिवगर्जनेतून करण्यात आला.


या समारोपप्रसंगी एसीपी प्रांजली सोनवणे, राज्य बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता मुळे, पावनखिंड चित्रपटात मधील कलाकार उदय वळसंगे व प्रदर्शनासाठी आलेले सोलापूरवासीय उपस्थित होते,

शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे संयोजन रवी मोहिते यांनी केले हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रदीप वानखेडे, विशाल गायकवाड, मनमोहन चोपडे, संतोष घोडके, विकास कदम, चेतन चौधरी, श्याम कदम, मनीष सूर्यवंशी, मनोज देवकर, आकाश काटकर, तुषार मागाडे, पोपट भोसले, उदय पाटील परिश्रम घेतले.
To Top