अक्कलकोट : अक्कलकोट पंचायत समिती, शिक्षण विभागाकडून सन२०२०-२१ या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, दहिटणेवाडी येथील विद्यार्थी प्रिय व उपक्रमशील उपशिक्षक जमालोद्दिन हैदर शेख यांना नुकताच प्राप्त झाला. अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन हा पुरस्कार शेख यांना प्रदान करण्यात आला.
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभास सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले,अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती कुदसिया शेख, केंद्र प्रमुख बसवराज गुरव, मुख्याध्यापक धर्मराज रमणशेट्टी, सहकारी शिक्षक विजयकुमार जोज, राहुल गोविंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपचे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन आळगी आणि तोळणूरचे इक्बाल जमादार यांनी तसेच दहिटणेवाडी येथील ग्रामस्थांनी शेख यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
शासनाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल जमालोद्दीन शेख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.