बालाजी कंपनीमधील कर्मचाऱ्यांची 'स्वच्छता हीच सेवा; एक तास ! अंतर्गत महात्मा गांधींना श्रद्धांजली

shivrajya patra
सोलापूर : बालाजी अमाईन्स व  हॉटेल बालाजी सरोवर प्रिमिअर तसेच बालाजी ग्रुप मधिल कंपनी वतीने स्वच्छता हीच सेवा : एक दिवस - एक तास ! या अभियानात सहभाग नोंदवत स्वच्छ भारत हीच आपल्या देशाने महात्मा गांधीजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अर्पण केलेली सर्वोत्तम श्रद्धांजली ठरली

हे ध्येय साध्य करण्यासाठी रविवारी, १ आॕक्टोबर रोजी सकाळी बालाजी अमाईन्स लि. व  हॉटेल बालाजी सरोवर प्रिमियर या बालाजी स्पेशालिटी केमिकल् लि., तिरुमला प्रेसिकास्ट या बालाजी ग्रुपच्या कंपन्यातील सुमारे २०० कर्मचारी व अधिकारी वर्ग यांनी सहभाग घेत, महावीर चौक ते मुलतानी फॅक्टरी होटगी रोड परिसरात सकाळी १० वा. पासून पंतप्रधान मोदी यांचे आवाहनानुसार स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जिथे कुठे असू तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात भाग घेऊन संपूर्ण परीसर २ ते ३ तासात स्वच्छता पुर्ण केली.   

बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांनी स्वच्छता अभियान मध्ये स्वतः २ तास सहभाग घेतला त्या भागातील दुकानदार व नागरीकांना स्वच्छतेबद्दल माहिती दिली. समारोपप्रसंगी सर्व कंपन्यातील कर्मचारी व अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले. आपण आज जे स्वच्छतेचे काम केले आहे, त्यामुळे परीसरातील नागरीक व दुकानदार यांनी दररोज आपला परीसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले . 

कार्यक्रमास तिरुमला प्रेसिकास्ट कंपनीचे चंद्रशेखर रेड्डी, बालाजी अमाईन्सचे मल्लिनाथ बिराजदार, अरुण मासळ, सादिक पटेल, शबाना तांबोळी, वर्षा गुंटूक, पवन ताटी, विनोद चुंगे, सचिन मोरे, असिफ कोतवाल, सरोवरचे ब्रिजेश  सिंग, साजन नटराजन, तोळणूर, निलगंगा कासे, दिवाकर गोसावी, दत्तप्रसाद सांजेकर सर्व ग्रुपचे कर्मचारी उपस्थित होते.
To Top