मोबाईल न दिल्याने पत्नीवर कात्री हल्ला

shivrajya patra

सोलापूर : मोबाईल न दिल्याच्या कारणावरून पती-पत्नीत झालेल्या बाचाबाचीचं पर्यवसान कात्री हल्ल्यात झाले. ही घटना जुना विडी घरकुलातील लक्ष्मी चौक परिसरात गुरुवारी, ७सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास घडली. वाणीश्री श्रीनिवास यासम (वय-२५ वर्षे) असं जखमी विवाहितेचे नांव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली थोडक्यात माहिती अशी की, लक्ष्मी चौक परिसरातील रहिवासी श्रीनिवास मलय्या यासम हा घरी आल्यावर, त्याने पत्नी सौ. वाणीश्री हिच्याकडे मोबाईल मागितला. त्यावेळी ती विड्यांची पाने कापून विड्या वळत बसली होती. तो दारू पिऊन आल्याचे पाहून तिने, त्याच्या मागणीकडं तिनं दुर्लक्ष केलं. 

त्याने चिडून तिला शिवीगाळी-मारहाण करीत विड्याची पाने कापायची कात्री हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात श्रीनिवासच्या हाताच्या तळव्यास कात्री लागून जखम झाली. तिच कात्री घेऊन त्याने पत्नी सौ. वाणीश्री हिच्या उजव्या हाताच्या दंडावर कात्रीने मारुन दुखापत केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात जखमीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.


To Top